वृत्तसंस्था /बेंगळूर
ग्रीनशेफ अप्लायन्सेस लिमिटेडने अलीकडेच एनएसइवर दमदार पदार्पण केले आहे. कंपनीचे समभाग इशू किंमतीच्या 17 रुपयांच्या प्रीमियमवर सूचीबद्ध झाले. 104 रुपये प्रत्येकीप्रमाणे कंपनीचे समभाग सूचीबद्ध झाले आहेत. ज्यांची इशू किंमत 88 रुपये प्रति समभाग होती. एचईएम सिक्युरिटीज लिमिटेड हे इशूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. बेंगळूरमधील गृहोपयोगी उपकरणांच्या निर्मितीत असणाऱ्या सदरच्या कंपनीने पहिल्या आयपीओमार्फत 53 कोटी रुपये उभारले आहेत. 23 ते 27 जूनपर्यंत खुला झालेला आयपीओ साठपटीने ओवरसबक्राईब झाला. बेंगळूरमध्ये तीन आणि हिमाचल प्रदेशमध्ये 1 प्लांट कंपनी चालवते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये कंपनी व्यवसाय विस्तारासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. किचन उपकरणांच्या बाजारपेठेत कंपनीने 60 टक्के इतका हिस्सा घेतला आहे. व्यवस्थापकीय संचालक प्रवीण जैन यांनी आयपीओतून मिळालेल्या रकमेचा वापर तुमकूरजवळ उभारण्यात येणाऱ्या नव्या कारखान्यासाठी केला जाणार आहे. नव्या उत्पादन विकासासाठी व इतर कारणांसाठीसाठीही निधी खर्च केला जाणार असल्याचे म्हटले आहे.









