वृत्तसंस्था / मेलबोर्न
माजी राष्ट्रीय रग्बी लीगचे बॉस टॉड ग्रीनबर्ग यांची क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख कार्यकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला.
टॉड ग्रीनबर्ग हे सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू संघटनेचे प्रमुख कार्यकारी आहेत. येत्या मार्चमध्ये ग्रीनबर्ग या नव्या पदाची सुत्रे हाती घेतील. 2020 साली हॉक्ले यांची क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओपदी हंगामी तत्वावर नियुक्ती केली होती. दरम्यान गेल्या ऑगस्टमध्ये हॉक्ले यांनी आपण हे पद सोडणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कळविले होते.









