वार्ताहर/उचगाव
उचगाव ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षात विविध विकासकामे राबवून अनेक लोकोपयोगी योजना कार्यान्वित करून नागरिकांची सोय करून दिल्याने कर्नाटक राज्याच्यावतीने ‘ग्रीन व्हिलेज’ ‘हसीरु ग्राममित्र’ हा बेळगाव तालुक्यामध्ये एकमेव उचगाव ग्रामपंचायतला मानाचा पुरस्कार नुकताच शासनामार्फत देण्यात आला आहे. बेळगाव येथील सीपीएड मैदानावर नुकत्याच झालेल्या एका समारंभात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी पाटबंधारे मंत्री सतीश जारकीहोळी, एम. एल. सी. चन्नराज हट्टीहोळी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, पीडीओ शिवाजी मडिवाळ, सेक्रेटरी, कर्मचारी यासह सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.









