अर्ज भरुन देण्याचे खात्याचे संबंधितांना आवाहन : पाच लाखांवरील उत्पन्नवाल्यांना मिळणार ग्रीन कार्ड,दोन हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी रेशनकार्डे दिली परत
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेल्या ग्रीन रेशनकार्डे देण्याची प्रक्रिया नागरी पुरवठा खात्याने सुऊ केली आहे. दुसऱ्या बाजूने सुमारे 2 हजारपेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची रेशनकार्डे परत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ऊ. 5 लाखापेक्षा अधिक आहे त्यांनी रेशनकार्डे खात्याकडे जमा करावीत, असे निर्देश नागरी पुरवठा खात्याने दिले आहेत. त्यानुसार अनेकांनी रेशनकार्डे परत दिली आहेत. काही कुटुंबांनी अजून दिलेली नाहीत. ऊ. 5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाला ओळखीचा पुरावा म्हणून ग्रीन रेशनकार्ड देण्यात येणार असून त्यावर मात्र कोणतेही धान्य मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. सदर ग्रीन रेशनकार्डे दोन महिन्यानंतर तयार होऊन ती मिळणार आहेत. त्यासाठी संबंधित कुटुंबाला एक अर्ज भऊन काही कागदपत्रांसह तो द्यावा लागणार आहे. ऊ. 5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांना ती ग्रीन रेशनकार्डे मिळणार आहेत. सर्व रेशनकार्डे जुनी झाली असून ती आता नवीन करण्याची प्रक्रिया देखील खात्याने सुऊ केल्याची माहिती देण्यात आली. अंत्योदय, एपीएल, बीपीएल अशी विविध प्रकारची रेशनकार्डे असून ती नवीन कऊन मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थसंकल्पातील प्रस्तावानुसार ही ग्रीन रेशनकार्डे देण्यासाठी नागरी पुरवठा खात्याने पावले उचलली आहेत. संबंधित कुटुंबानी त्यासाठी तालुकास्तरीय नागरी पुरवठा खाते कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









