बेळगाव : न्यू इंडियन क्राफ्ट्स एक्स्पो आता सोमवार दि. 8 मे पर्यंतच बेळगाव-सदाशिवनगरात लक्ष्मी कॉम्प्लेक्स शेजारी सुरू राहणार असून बेळगावकरांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात देशभरातील 100 हून अधिक स्टॉलधारकांनी भाग घेतला आहे. हे प्रदर्शन ताज थ्रेड, हँडलूम गुड्स व यश कम्युनिकेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण देशभरातील विविध राज्यांतील हस्तकला कारागीरांनी हातांनी बनविलेल्या वस्तू या हस्तकला प्रदर्शनात अत्यंत माफक दरात उपलब्ध होत आहेत. हँडमेड गिफ्ट्स, हँडमेड प्रॉडक्ट्स, ज्वेलरीसह टेराकोटा होम डेकोर विभागात तुलसी स्टॅन्ड, फ्लॉवर पॉट, वॉटर फाउंटन, तबला स्टॅन्ड, वॉल हँगिंग आणि हाताने बनविलेल्या शोभेच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तू गॅसच्या भट्टीत उत्तम प्रकारे भाजून तयार करण्यात आल्या असून सर्व आयटम्सवर 25 टक्केपर्यंत सूट दिली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये बनणाऱ्या जगप्रसिद्ध खुर्जा क्रॉकरी ज्यामध्ये फ्लॉवर पॉट, बरण्या, लाईटवेट डिनर सेट, प्लेट्स, बोन चायना, कप उपलब्ध असून ते 20 टक्के सवलतीत दिले जात आहेत.
कार्पेटच्या दुनियेतील नवा आविष्कार असलेल्या काश्मिरी सिल्क कार्पेट्स, हूर कार्पेट्स, इम्पोर्टेड ऑस्ट्रेलिया व इराण कार्पेट्स, पार्शियन कार्पेट्स, मरिनो ऊल कार्पेट्स या 2 बाय 6 ते 9 बाय 12 पर्यंतच्या आकारात उपलब्ध आहेत. जगप्रसिद्ध मिर्झापूर बधोई हँडमेड कार्पेट्स आणि थ्रीडी कार्पेट्ससुद्धा उपलब्ध असून ग्राहकांना 20 टक्केपर्यंतची सवलत दिली जात आहे. पॅशन फिएस्टा स्टॉलवर वेस्ट कोस्ट क्लॉथपासून बनविलेली बॉम्बे फॅन्सी कुर्ती, दिल्ली फॅन्सी, नायरा कट ड्रेस, कराची कुर्तीज, लेगिन्स, प्लाझो उपलब्ध आहेत. खास उन्हाळा व लग्न सराईसाठी खादी शर्ट्स, कुर्ता, पायजमा, जॅकेट्स, पॅन्ट्स याचबरोबर लखनवी चिकन, एम्ब्रॉयडरी सुट्स, जॉर्जेट, शिफॉन, रेऑन कॉटन, मलमल, मुडाल या कपड्यांवर हॅन्डवर्क एम्ब्रॉयडरी केलेले आयटम्स उपलब्ध आहेत. सहारनपूर फर्निचर विभागात बियर बार कपाट, रॉकिंग चेअर, डायनिंग टेबल, सिंगापुरी सोफा सेट्स, पलंग, आयर्नमध्ये दिवान, सोफा, कोच 20 टक्केपर्यंत सवलतीच्या दरात विकले जात आहेत. याशिवाय डिझायनर क्लॉथ, केरला साड़ी, पंजाबी व राजस्थान पायपोस, हर्बल प्रॉडक्ट्स, होम फर्निशिंग बुक्स, शूज रॅक, काश्मिरी शाल व सूट, खादी कपड़ा, खादी हॅण्डलुम, गुजराती पर्स, किचन वेअर, राजस्थानी लोणचे, लाखेच्या बांगड्या, टी-शर्ट, मुलांची खेळणी, जयपुरी रजई, लेदर आयटम, बेडशीट, वुडन कार्विंग, मेटल क्राफ्ट, लेडिज कुर्ती, गाऊन, क्रॉकरी, आयुर्वेदिक उत्पादने, राजस्थानी चुरण, सॉफ्ट खेळणी, चन्नपटणा खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीसाठीचे विविध साहित्य, हैद्राबादी बँगल्स, मोती, खवय्यांसाठी मसाले, लोणचे, पापड, चटण्या, विंडोज डोअर कर्टन्स, लेडिज गाऊन, मोबाईल कव्हर, शिवाय मैसूर हेअर ऑईल, तिरुपूर टी-शर्ट, पायजमा, ट्रॅक सूट, खेकडा बेडशीट्सच्या शेकडो व्हरायटीज अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत. प्रवेश व पार्किंगची मोफत सोय आहे. हस्तकला कारागीरांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक आशुतोष शर्मा व प्रकाश कालकुंद्रीकर यांनी दिली.









