भाजपला मतदान करण्याचे मतदारांना आवाहन : दिवसभरात जोरदार प्रचार
बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांना दिवसेंदिवस मतदारांचा पाठिंबा वाढत आहे. बुधवारी दिवसभरात त्यांनी जोरदार प्रचार करत मतदारसंघ पिंजून काढला. घरोघरी जात मतदारांना विनवणी करत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. फुलबाग गल्ली येथून प्रचाराला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रचाराला प्रारंभ झाला. डॉ. रवी पाटील यांनी मागील काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात मोठे कार्य केले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवा, सर्वसामान्यांचे प्रश्न ते हक्काने सोडवतील, असा विश्वास बुडाचे चेअरमन संजय बेळगावकर यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला. मुजावर गल्ली परिसरात महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करत डॉ. रवी पाटील यांचे स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करत धुमधडाक्यात रवी पाटील यांचे स्वागत करण्यात आले. महांतेशनगर येथील ग्लास हाऊस परिसरात ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. चहासोबत नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेत निवडून आल्यास प्रत्येक समस्या मार्गी लावू, असे आश्वासन मतदारांना दिले. कोनवाळ गल्ली, केळकर बाग, रामलिंगखिंड गल्ली, किर्लोस्कर रोड, महादेव गल्ली, अनसूरकर गल्ली या परिसरात जाऊन डॉ. रवी पाटील यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. सायंकाळच्या सुमारास शिवाजीनगर, वीरभद्रनगर येथे प्रचारफेरी काढण्यात आली. महिलांसह भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. डॉ. रवी पाटील यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावेळी मतदारांनी आपण भाजपलाच मतदान करू, असे आश्वासन त्यांना दिले.
उद्याचा प्रचारफेरी मार्ग
गुरुवारी सकाळी पी. के. क्वॉर्टर्स, आझमनगर, विद्यागिरी, वैभवनगर या परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला जाणार आहे. सकाळी 10 वाजता टिळक चौक येथे डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. सायंकाळी शनिवार खूट, खंजर गल्ली, खडेबाजार, भोई गल्ली, पांगुळ गल्ली, माळी गल्ली, आझाद गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कसाई गल्ली, कामत गल्ली येथे प्रचारफेरी काढली जाणार आहे.









