विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी दै. तरूण भारत संवाद अंकाचे केले वितरण
सोलापूर : आज असलेल्या भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित सोलापूर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी दै. तरूण भारत संवाद अंकाचे वितरण केले. विक्रेत्यांबद्दलची कृतज्ञता म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा तिनही ऋतूंमध्ये न यकता अखंडपणे वृत्तपत्र विक्रेते ठरलेल्या वेळी वृत्तपत्राचे वाटप करतात. गेल्या अनेक शालेय विद्यार्थ्यांनी वाटप केला तरूण भारत संवादचा अंक, वाचन प्रेरणा दिनानिमित्त तरूण भारत संवादचा उपक्रम वर्षापासून प्रामाणिकपणे, काटेकोरपणे व निष्ठेने विक्रेत्यांकडून वृत्तपत्राचे वितरण केले जाते. पहाटेपासून नागरिकांपर्यंत सत्य, ताज्या व विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्याच्या त्यांच्या सेवेमुळे समाजातील माहितीची साखळी आजही अखंड सुरू आहे.
त्यांच्या या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवशंकर बोबडे प्रशालेतील यश विकास वाघमारे, सिद्धेश्वर प्रशालेतील सिद्धार्य संतोष गुल्लोळी, पुल्ली कन्या प्रशालेतील वेदा नंदकिशोर हबीब आणि नेहा नंदकिशोर हबीब तर लोकमंगल प्रशालेतील विश्वास प्रकाश बल्लारी, आणि बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूलमधील गिरीशप्रसाद शिवलाल तिवारी या विद्यार्थ्यांनी शहरातील विविध भागांमध्ये तरूण भारत संवादचे वितरण केले.








