महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन
बेळगाव : सीमाभागातील साहित्यिक व शैक्षणिक संस्थांना महाराष्ट्र शासन बृहन् महाराष्ट्र अनुदान योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन मराठी विभाग व राज्य मराठी विकास संस्था यांच्याकडून आर्थिक अनुदान देण्याची तरतूद लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये दिले. वाशी, मुंबई येथे सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित केलेल्या मराठी विश्व संमेलनामध्ये हे जाहीर केले. बेळगावमधून गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधिनीचे इंद्रजित मोरे, निला आपटे, प्रसाद सावंत, हर्षदा सुंठणकर यांनी संमेलनात भाग घेतला. प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकारकडे अनुदानासाठी विनंती करण्यात आली होती.









