पुणे : घर आणि दागिन्यांच्या मोहापायी पोटच्या नातवाने वडिलांच्या मदतीने आजीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे इलेक्ट्रॉनिक कटरने तुकडे करून नदीपात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी मुलासह नातवाला अटक केली आहे.
उषा विठ्ठल गायकवाड, वय 62 रा म्हसोबा नगर, केशवनगर, मुंढवा असे खून केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संदीप विठठल गायकवाड (वय 42) आणि साहील ऊर्फ गुडडु संदीप गायकवाड (20) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 ऑगस्टला मुंढवा परिसरात घडली आहे.
अधिक वाचा : सत्ताप्राप्तीसाठी राजकारणात कुणालाही पक्षप्रवेश; गिरीश बापट यांचा भाजपाला घरचा आहेर
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल राहत असलेले घर आजीच्या नावावर होते. त्या साहिल आणि त्याच्या वडिलांना घर सोडून जाण्यास सांगत होत्या. त्यामुळे साहिल आजीवर चिडून होता. गेल्या महिन्यात उषा घरात दुपारी झोपल्या होत्या. झोपेत असलेल्या आजीचा साहिलने वडिलांच्या मदतीने गळा आवळून खून केला. त्यानंतर आजीचा मोबाईल त्याने भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात लपवून ठेवला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने आजी बेपत्ता झाल्याचा बनाव रचला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने उषा यांचा मोबाईल गादीखाली लपवून ठेवला. त्यानंतर मंगळवार पेठेतून झाड कापण्याचे इलेक्ट्रिक कटर मशिन विकत घेतले. उषा यांचा मृतदेह बाथरूममधे ओढत नेऊन त्यांच्या शरीराचे तुकडे केले. मासांचे तुकडे पोत्यात भरुन ते मोटारीतून केशवगरमध्ये नेले. तेथे नदीत काही मृतदेहाचे तुकडे टाकले. तर थेऊर येथील नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात काही तुकडे टाकले. नंतर घरी येवुन कटर मशिन व रक्ताने भरलेले कपडे हे मांजरीतील नदी पात्रात वाहत्या पाण्यात टाकले होते.
दरम्यान, काही दिवसांनी वाडेगावत एक मानवी उजवा पाय मुळा मुठा नदीच्या कडेला मिळाला होता. त्यानुसार पोलिसांनी साक्षीदार व शास्त्रीय पुरावे तपासून बाप लेकाला जेरबंद केले.









