बैलहोंगलजवळील नयानगरमध्ये अपघात
प्रतिनिधी/ बेळगाव
मोटारसायकलवरून पडून एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. तर तिचा नातू जखमी झाला आहे. शुक्रवारी बैलहोंगल तालुक्यातील नयानगरजवळ हा अपघात घडला असून बैलहोंगल पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
गंगम्मा कुलकर्णी (वय 75) रा. बुदिहाळ, ता. बैलहोंगल असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धेचे नाव आहे. तिचा नातू गंगाधर कुलकर्णी (वय 24) हा जखमी झाला असून त्याला बैलहोंगल येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
आपल्या आजीचे आधारकार्ड बनविण्यासाठी गंगाधर आजीला मोटारसायकलवरून घेऊन जात होता. नयानगरजवळ म्हैस आडवी आल्यामुळे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून दोघेही खाली पडले. या अपघातात वृद्धा जागीच ठार झाली. पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.









