वृत्तसंस्था/ डनकर्क (फ्रान्स)
येथे झालेल्या 41 व्या कॅपेली ला ग्रेनेडी आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर पी. इनियानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स माहेलने टायब्रेकरमध्ये भारताच्या पी. इनियानचा पराभव करत विजेतेपद पटकाविले.
भारताचा पाचवा मानांकित पी. इनियानने या स्पर्धेत 6 डाव जिंकले असून 3 डाव बरोबरीत सोडवित एकूण 7.5 गुण नवव्या फेरीअखेर नोंदविले. फ्रानसच्या माहेलने 9 फेऱ्या अखेर इनियान प्रमाणेच 7.5 गुण नोंदविल्याने उभयतामध्ये टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये माहेलने इनियानवर विजय नोंदविला. या स्पर्धेत भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर मुतय्या याने तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये भारताच्या इनियानला 16 रेटिंग गुण मिळाले.









