29 ऑक्टोबर होणार मैदान
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा महर्षी वाल्मिकी कुस्तीगीर संघटना कंग्राळी खुर्द आयोजित महर्षी वाल्मिकी जंयती निमित्य राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती मैदानाचे आयोजन रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी अलतगा रोड, खडी मशीनजवळील मैदानावर करण्यात आले आहे.
सदर मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय पदक विजेते सुबोध पाटील (पुणे) व कालिया (दिल्ली) यांच्या होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार (पुणे) व शांताराम शिंदे (सांगली) यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रेम जाधव (कंग्राळी) व शुभम भोसेकर (पुणे), चौथ्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वी पाटील (कंग्राळी खुर्द) व विक्रम (शिनोळी), पाचव्या क्रमांकाची कुस्ती किरण अष्टगी व विशाल शेळके, सहाव्या क्रमांकाची कुस्ती सुशांत (कंग्राळी खुर्द) व दयानंद (शिरगाव), सातव्या क्रमांकाची कुस्ती सौरभ (राशिवडे) व मल्लेश मेत्री, आठव्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील (कंग्राळी खुर्द) व पंकज (चापगाव), नवव्या क्रमांकाची कुस्ती प्रथमेश (कंग्राळी खुर्द) व आंsकार (राशिवडे), दहाव्या क्रमांकाची कुस्ती महेश तिर्थकंडे व सुरज (कडोली) यांच्यात होणार आहे. त्याशिवाय 40 हून अधिक लहान – मोठ्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुरेश अष्टगी यांनी दिली.









