बेळगाव : सावगाव येथे जय हनुमान कुस्तीगीर संघटना व मराठी संघटन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धुलीवंदनानिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन रविवार दि. 23 रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर मैदानात प्रमुख कुस्ती आंतरराष्ट्रीय पदक विजेता उदयकुमार दिल्ली वि. महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध यांच्यात, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय पदक विजेता अनुज कुमार-दिल्ली, पुण्याचा उदयकुमार खांडेकर, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन कामेश कंग्राळी व सांगलीचा करण दोहा, चौथ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन विक्रम शिनोळी वि. विशाल सांगली, पाचव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव वि. संजू इंगळगी दर्जा, सहाव्या क्रमांकाची कुस्ती संतोष मोडे-सांगली वि. पार्थ पाटील-कंग्राळी, सातव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वी पाटील-कंग्राळी वि. पवन चिकदिनकोप्प-भांदुर गल्ली, प्रथमेश हट्टीकर-कंग्राळी वि. राष्ट्रीय पदक विजेता बॉबी ठाकुर, नवव्या क्रमांकाची कुस्ती निखिल-कंग्राळी वि. गिरीश दर्गा, दहाव्या क्रमांकाची बाळु साळुंखे-महाराष्ट्र वि. महेश तीर्थकुंडये यांच्यात होणार आहे. या शिवाय महिलांच्या कुस्ती प्रज्ञा पाटील-कंग्राळी वि. कल्याण आंबेळकर-वाघवडे, श्रावणी तरळे-आंबेवाडी वि. प्रभा-खादरवाडी, राधिका-संतीबस्तवाड वि. भक्ती पाटील-कंग्राळी यांच्यात होणार आहे. तर आकर्षक कुस्ती ओमकार-सावगाव वि. संकेत कोल्हापूर यांच्यात होईल. स्वप्नील सुतार-सावगाव वि. श्रीनंद निलजी यांच्यात होणार आहे. या शिवाय 70 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.










