सिकंदर शेख-दिनेश गोलिया यांच्यात प्रमुख लढत, याशिवाय 75 कुस्त्यांचे आयोजन

बेळगाव ; कणबर्गी येथील जय हनुमान कुस्तीगीर संघ कणबर्गी आयोजित हनुमान जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी विराट मैदान सोमवार दि. 10 एप्रिल रोजी जय हनुमान कुस्ती आखाडा, बस स्टँडसमोर कणबर्गी येथे आयोजित केले आहे. या कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जवळपास 30 ते 40 हजार कुस्ती शौकिनांची बसण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धा सचिव गणपत बन्नोसी व प्रमुख पुरस्कर्ते माजी नगरसेवक संजय सुंठकर यांनी दिली आहे. य् ाा मैदानात प्रमुख कुस्ती महान भारत केसरी महाराष्ट्राचा धडाकेबाज मल्ल सिकंदर शेख व हरियाणाचा राष्ट्रीयपदक विजेता दिनेश गोलिया हरियाणा यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी पंजाबचा प्रवीण भोला व महाराष्ट्र केसरी वर्ल्ड चॅम्पियन एएसआय सेंटर पुण्याचा पृथ्वीराज पाटील यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती भारखड कुस्ती केंद्र इंदापूरचा भारत मदने व राष्ट्रीय पदक विजेते दिल्लीचा युधीष्ठिर यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय पदक विजेता महारुद्रा काळेल कुरडेवाडी व रोहिल हरियाणा यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार मठपती आखाडा व बंटीकुमार दिल्ली यांच्यात, सहाव्या क्रमांकाची कुस्ती शिवानंद द•ाr कोल्हापूर व कमलजित पंजाब यांच्यात, आठव्या क्रमांकाची कुस्ती रोहित कंग्राळी व सतीश पुजारी हनुमान आखाडा रोप यांच्यात, नवव्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी घोटगेरी व किर्तीकुमार बेनके लहान कंग्राळी, दहाव्या क्रमांकाची कुस्ती शिवय्या पुजारी व दिनेश घाडगे कुरडेवाडी यांच्यात होणार आहे. मेंढ्याची कुस्ती महेश तीर्थकुंडये व सागर सांगली यांच्यात होणार आहे. तर आकर्षक कुस्ती किरण अष्टगी कलखांब व ओमकार सांगली तर पार्थ पाटील कंग्राळी व गौस दर्गा यांच्यात होणार आहे. याशिवाय लहान मोठ्या 60 हून अधिक कुस्त्या नेमण्यात आल्या आहेत.









