पृथ्वीराज पाटील-शानवीर कोहली यांच्यात प्रमुख लढत
बेळगाव : श्री हनुमान कुस्तीगीर संघटना, श्री हनुमान जयंती निमित्त मुतगा येथे रविवार दि. 6 एप्रिल रोजी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मैदानात प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील वि. पंजाब केसरी शानवीर कोहली यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे वि. दिल्लीचा राष्ट्रीय पदक विजेता हरिषकुमार, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती शिवा दड्डी वि. करण दिल्ली, चौथ्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळी वि. विश्वजित रुपनर-कराड, पाचव्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी वि. प्रथमेश पाटील-ऐनापूर, सहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंग्राळी वि. विशाल सांगली यांच्यात होणार आहे. या शिवाय लहान मोठ्या 50 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन मुतगा येथील दमनी तलाव येथे होणार आहेत. मैदान यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.









