पदयात्रा काढून मतदारांशी साधला संवाद
वार्ताहर /नंदगड
खानापूर मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांनी रविवारी खानापूर शहरात भव्य पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेत म. ए. समितीला मतदान करण्याचे आवाहन केले. गल्लोगल्ली मुरलीधर पाटील यांचे महिलांनी आरती ओवाळून स्वागत केले. त्यांनी म. ए. समितीला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. य् ाsथील गणेश मंदिरात पूजा करून म. ए. समितीच्या प्रचार पदयात्रेला सुऊवात करण्यात आली. खानापूर-बेळगाव रस्ता, दुर्गानगर, निंगापूर गल्ली, विठोबा देव गल्ली, बाजारपेठ, घोडे गल्ली, गुरव गल्ली, केंचापूर गल्ली, घाडी गल्ली, लक्ष्मीनगर, न्यू नाईक गल्ली, पारिश्वाड क्रॉस आदांसह शहरातील विविध भागात पदयात्रा काढून मुरलीधर पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत म. ए. समितीला मतदान करण्याचे आवाहन केले. य् ाा पदयात्रेत उमेदवार मुरलीधर पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, यशवंत बिरजे, प्रकाश चव्हाण, सीताराम बेडरे, माऊती गुरव, डी. एम. गुरव, विठ्ठल गुरव, निरंजन सरदेसाई, अॅड. केशव कळ्ळेकर, पुंडलिक कारलगेकर, कृष्णा कुंभार, विजय राजपूत, ज्ञानेश्वर सनदी, प्रल्हाद पाटील, नारायण पाटील, विलास निलजकर, आबासाहेब दळवी, रणजीत पाटील, दशरथ पाटील, प्रवीण पाटील, सुनील पाटील, जगन्नाथ बिर्जे, विनायक सावंत, प्रतीक देसाई, पांडुरंग सावंत, यशवंत पाटील, सदानंद पाटील, राजाराम देसाई, महादेव घाडी, जयवंत पाटील, परशराम चौगुले, नारायण चोपडे, कृष्णा मन्नोळकर, रमेश देसाई, नारायण कापोलकर, प्रल्हाद मादार आदांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.









