उचगाव येथे उद्या मूर्ती प्रतिष्ठापना, अनावरण, उद्घाटन समारंभ
वार्ताहर /उचगाव
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन मूर्तीची मिरवणूक गुरुवारी आंबेडकर गार्डन बेळगाव येथून सवाद्य उचगावच्या दिशेने प्रस्थान झाली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचे पूजन व उद्घाटन मिरवणूक अध्यक्ष गजानन कोरे यांच्या हस्ते केले. यावेळी यादो कांबळे यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ केला. यावेळी उचगाव आंबेडकरनगरमधील स्त्राr, पुरुष, युवकांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. मिरवणुकीचे हिंडलगा, सुळगा येथे स्वागत केले. गुरुवारी सायंकाळी उचगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी उचगाव पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या हस्ती डॉ. आंबेडकरांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजन केले मूर्ती प्रतिष्ठापना, अनावरण, उद्घाटन समारंभ शनिवार दि. 12 रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला ग्रामस्थ, युवक मंडळ, भीमसैनिक आणि मित्र मंडळींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.









