आस्था ग्रुप आयोजित स्पर्धा
मालवण / प्रतिनिधी
मालवण येथील आस्था ग्रूप तर्फे तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 3 सप्टेंबर रोजी मालवण टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केली आहे. याचे उद्घाटन टोपीवाला हायस्कूलचे कार्याध्यक्ष दिगंबर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.17 वर्षाखालील मुलगे, मुली अशा आज दोन गटात ही स्पर्धा होणार आहे.विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट चढाई, पकड आणि अष्टपैलू खेळाडू यांनाही पारितोषिक देण्यात येणार आहेत.
यावेळी टोपीवाला मुख्याध्यापक डी. एस. खानोलकर, आस्था ग्रुप अध्यक्ष उमेश मांजरेकर, सचिव विजय कामत, अजय शिंदे, रेनाॅल्ड भुतेलो, सागर नरे, सुर्यकांत फणसेकर, सौगंधराज बादेकर, अनिकेत फाटक, रवि मिटकर, चौके उपसरपंच पी. के. चौकेकर, मनोज चव्हाण, कुणाल मांजरेकर, रामभाऊ पेडणेकर, निनाद बादेकर, बंटी चव्हाण, संग्राम कासले, अविनाश मांजरेकर, पंकज गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.









