प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथील सुप्रसिद्ध ‘माणिकबाग सुझुकी’ शोऊमच्या नव्या टू व्हीलर वर्कशॉपचे उद्घाटन एका शानदार कार्यक्रमात गुऊवारी करण्यात आले. नवे वर्कशॉप माणिकबाग
शोऊमच्या शेजारीच आहे. ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा आणि सुविधा देता याव्यात या उद्देशाने हे नवे वर्कशॉप स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांमध्ये नेत्रावती भागवत (नगरसेविका), विजय निंबरगीकर (अध्यक्ष, बेळगाव मेपॅनिक), विश्वनाथ पाटील (रिजनल सर्व्हिस मॅनेजर, सुझुकी इंडिया मोटारसायकल इंडिया लिमिटेड), चंद्रशेखरन (रिजनल सेल्स मॅनेजर, सुझुकी मोटारसायकल इंडिया लिमिटेड), नारायण वैद्य (एरिया सर्व्हिस मॅनेजर, सुझुकी मोटारसायकल इंडिया लिमिटेड), भूषण मिर्जी (संचालक, माणिकबाग ग्रूप), रमेश शाह (संचालक, माणिकबाग ग्रूप), शील मिर्जी (संचालक, माणिकबाग ग्रूप), शैलेश खटावकर (जनलर मॅनेजर, माणिकबाग ग्रूप) आणि विक्रम पुजारी (सर्व्हिस मॅनेजर, माणिकबाग ग्रूप) यांचा समावेश होता.









