आधुनिक घरकुलांना लागणारे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध
बेळगाव : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अंजनेयनगर येथे श्रीराम इनोव्हेशनचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीप हंगिरगेकर यांच्या हस्ते फीत सोडून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी, कर्नाटक क्रेडाईचे सदस्य राजेंद्र मुतगेकर, श्रीराम इनोव्हेशनचे मालक सचिन हंगिरगेकर, पूनम हंगिरगेकर, संजय चंदगडकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कुलदीप हंगिरगेकर म्हणाले, एकाच छताखाली घरकुलाचे अंतर्गत साहित्य उपलब्ध होणार आहे. विशेषत: आधुनिक पद्धतीचे साहित्य ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या श्रीराम इनोव्हेशनमध्ये आधुनिक पद्धतीच्या दरवाजांचे लॉक, किचन साहित्य, बाथरूम फिटिंग्ज, सॅनिटिवीयर आणि विनियर्स साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल, कलर, किचन ट्रॉली, फॅन्सी दरवाजे, केबिन फिटींग, वूडनप्ले आदी साहित्यही माफक दरात उपलब्ध करण्यात येणार आहे. आधुनिक घरकुलला लागणारे अंतर्गत सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे शहरातील घरकुलाचे स्वप्न बघणाऱ्यांना माफक दरात दर्जेदार साहित्य उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी गोदरेज कंपनीचे प्रतिनिधी अब्दुलखादर मकानदार, अमुल्या मायक्का कंपनीचे विजय शेट्टर, मनीगोल्ड प्लायवूडचे आशिष अरोरा, सुनील पवार आणि श्रीकांत कासार यांसह मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते.









