कुटुंबीयांच्या हस्ते फीत कापून नवीन वास्तूत शुभारंभ
बेळगाव : शनिवार खूट येथे रविवारी प्रसाद मेडिकल मॉलचे थाटात उद्घाटन करण्यात आले. संचालक खाचू पाटील, प्रोप्रा. सी. के. पाटील, प्रसाद पाटील व कुटुंबीयांच्या उपस्थितीत फीत कापून दिमाखात उद्घाटन झाले. प्रारंभी सी. के. पाटील दांपत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा झाली. त्यानंतर भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. बेळगाव शहरात पहिल्यांदाच भव्य मेडिकल मॉलला प्रारंभ झाल्याने मेडिकल क्षेत्राशी संबंधित सर्व साहित्य उपलब्ध होणार आहे. एकाच छताखाली नागरिकांना सर्व प्रकारची औषधे उपलब्ध होणार आहेत. विशेषत: औषधांबरोबर जनावरांची औषधे, पाळीव प्राण्यांची औषधे, ऑर्गेनिक पद्धतीने पिकविलेली कडधान्ये मिळणार आहेत. यावेळी सी. के. पाटील यांना मान्यवर व पै-पाहुण्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षांपासून काकतीवेस रोड येथील प्रसाद मेडिकलच्या माध्यमातून सेवा दिली आहे. आता शनिवार खूट येथील नवीन वास्तूत प्रसाद मेडिकलचे स्थलांतर झाले आहे. या ठिकाणी जनसामान्यांना वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सुविधा उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या प्रसाद मेडिकलमध्ये काही औषधे सवलतीच्या दरात पुरविली जाणार आहेत.









