बेळगाव : एकाच छताखाली संपूर्ण भारतातील उत्पादने आपल्याला न्यू इंडियन क्राफ्टने 100 हून स्टॉलच्या माध्यमातून येथे उपलब्ध करून दिलेत याचा बेळगावकरांनी लाभ घ्यावा. तसेच हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी यांनी रविवारी उद्घाटनप्रसंगी केले. प्रारंभी फीत कापून व दीपप्रज्वलनाने न्यू इंडियन क्राफ्ट प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी दिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या संचालिका सोनिया जांग्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्रारंभी यश कम्युनिकेशनचे संचालक, आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला. न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पोमध्ये भारतातील सर्व राज्यांतून मांडलेल्या आकर्षक व नाविन्यपूर्ण वस्तूंची बेळगाव येथील महिलांनी प्रत्यक्ष पाहणी करून खरेदी करावी, असे आवाहन सोनिया जांग्रा यांनी केले. न्यू इंडियन क्राफ्टस एक्स्पो आता कुंदानगरी बेळगाव सदाशिवनगर परिसरांत लक्ष्मी कॉम्पलेक्स शेजारी येथे सुरू आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा काश्मीर, शिमला, पंजाब, आसाम, अऊणाचल, प. बंगाल, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, केरला, आंध्र, तामिळनाडू व कर्नाटक येथील हस्तकला कारागीरांनी बनविलेल्या वस्तू या प्रदर्शनात माफक दरात उपलब्ध आहेत.
हँडमेड गिफ्ट्स, हँडमेड प्रोडक्ट्स, ज्वेलरी, होमडेकोर, टेराकोटा व खुर्जा क्रॉकरी, डिझाईनर क्लॉथ, कोलकाता, आसामी क्लॉथ, पंजाबी व राजस्थानी चप्पल, कारपेट, पायपोस, हर्बल प्रोडक्ट्स, होम फर्निशिंग बुक्स, शूज रॅक, काश्मिरी शाल व सूट, खादी कपडा, खादी हॅण्डलुम, गुजराती व कलकत्ता पर्स, किचनवेयर, सहारनपूर फर्निचर, राजस्थानी लोणचे, लाखेच्या बांगड्या, टी-शर्ट, मुलांची खेळणी, जयपुरी रजई, लेदर आयटम, बेडशीट, वूडन कार्विंग, मेटल क्राफ्ट, लेडिज कुर्ती, गाऊन, क्रॉकरी, बरण्या, आयुर्वेदिक उत्पादने, राजस्थानी चुरण, सॉफ्ट खेळणी, चन्नपटणा खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीचे साहित्य, हैद्राबादी बँगल्स, मोती, खवय्यांसाठी मसाले, लोणचे, पापड, चटण्या, विंडोज डोअर कर्टन्स, लेडिज गाऊन, मोबाईल कव्हर, शिवाय मैसूर हेअर ऑईल, तिऊपुर टी-शर्ट, पायजमा, ट्रॅक सूट, खेकडा बेडशीट्सच्या शेकडो व्हरायटीज अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत. सदर प्रदर्शन 35 दिवस चालणार असून प्रदर्शनात प्रवेश व पार्किंगची मोफत सोय आहे. यावेळी आयोजक आशुतोष शर्मा तसेच आकाश कुमार, बाबू अवस्थी, धरमिंद कुमार, सिंतू कुमार, अनिल शर्मा, सराफत अली, इम्रान अली, फुरकान अली, दिपू कुमार, सुहेब, हसन, सन्नी सिंग उपस्थित होते.









