बेळगाव : बेळगावातील नवे बुटीक हॉटेल ‘लँडमार्क बाय पै’चे मंगळवार दि. 24 जानेवारी रोजी थाटात उद्घाटन झाले. प्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनियर दिलीप कुलकर्णी व अविनाश पोतदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार बाळकृष्ण व अशोक पै यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी स्व. विश्वनाथ पै यांच्या आठवणी जाग्या केल्या, ज्यांनी बेळगावात हॉटेल उद्योगाचा पाया रोवला. यावेळी बाळकृष्ण, अशोक, श्रीपाद, अजय व विनय पै यांच्या हस्ते या नव्या हॉटेलच्या उभारणीच्या कामात मोलाचा वाटा उचललेल्या कारागीर, कंत्राटदार तसेच डिझायनर्सचा हृद्य सत्कार करण्यात आला. अभय पै यांनी सूत्रसंचालन केले व अक्षय पै यांनी आभार मानले.
वेणुग्राम हॉस्पिटलजवळ हे नवे बुटीक हॉटेल प्रसिद्ध आर्किटेक्ट बकुळ जोशी यांनी डिझाईन केले आहे. येथे सुसज्ज रेस्टॉरंट, राहण्यासाठी आधुनिक सोयी व उत्तम डिझाईन केलेल्या खोल्या, सुइट्स, बँक्वेट हॉल तसेच कार्यक्रमांसाठी टेरेसची सोय आहे. हॉटेल मंगळवारपासून पूर्णपणे कार्यरत झाले आहे.









