चंदगड : बेळगाव-मच्छे येथे हॉटेल प्रणामचे शानदार उद्घाटन बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील, महाराष्ट्राचे माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील, दौलत साखर कारखान्याचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील म्हणाले, गोवा आणि महाराष्ट्रानंतर लक्ष्मण गावडे यांनी बेळगावमध्ये हॉटेल चालू करून बेळगावकरांना एक स्वादीष्ट व चटकदार नाश्ता व उत्कृष्ठ शाकाहारी जेवणाची उत्तम सोय केली असून सिमाभागातील आम्हा खवय्यांची भूक भागवली. लक्ष्मण गावडेनी कर्नाटकात अजून शाखा काढाव्यात. त्यांच्या हॉटेलमधील पदार्थ खाऊन आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो आहे, असे सांगून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे शिवाजीराव पाटील यांनी कर्नाटकाबरोबर आमच्या महाराष्ट्रामध्ये गडहिंग्लज, आजरा या ठिकाणी हॉटेल चालू करण्यास विनंती केली. तसेच भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, डॉ. पद्मराज पाटील, बाबुराव हळदणकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी चंदगडचे माजी जि.प.सदस्य सचिन बल्लाळ, भाजता तालुका अध्यक्ष नामदेवराव पाटील, दौलतचे चेअरमन अशोकराव जाधव, व्हाईस चेअरमन संजय पाटील, सुरेश सातवणेकर, डॉ. परशराम गावडे, अंकुश गवस, अनिल सुरुतकर, बामण यजदाणी, गिरीश गणमुखी, अतुल दाणी, विकास पाटील, तुकाराम बेनके, सुनील हळदणकर, डॉ. कुराडे, भावकू गुरव, मायाप्पा पाटील, प्रताप सूर्यवंशी यांच्यासह महाराष्ट्र व बेळगाव येथील मान्यवर उपस्थित होते.









