शुद्ध शाकाहारी प्रेमींसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती : चटकदार पदार्थांचीही पर्वणी
बेळगाव : खाद्यप्रेमींच्या आग्रहास्तव कॉलेज रोड येथील हॉटेल आदर्श पॅलेस येथे ‘आंगन’ या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटचे शुक्रवारी दिमाखात उद्घाटन करण्यात आले. शाकाहारी खवय्यांसाठी विविध प्रकारचे देशभरातील खाद्यपदार्थ या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. कायदा सुव्यवस्था व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या हस्ते रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले. आदर्श समूहाचे अध्यक्ष हरिष व पूनम गुलबानी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हरिष गुलबानी यांनी आदर्श समूहामार्फत सुरू करण्यात आलेल्या उद्योगांची माहिती दिली. हॉटेल व कापड उद्योगात आदर्श ग्रुपने एक वेगळी उंची गाठली आहे. आदर्श हॉटेलमध्ये यापूर्वी व्हेज-नॉनव्हेज खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थ उपलब्ध होते. काही शाकाहारी प्रेमींनी स्वतंत्र रेस्टॉरंटची मागणी केली होती. त्यानुसार शुद्ध शाकाहारी पदार्थ उपलब्ध असणारे रेस्टॉरंट सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शाकाहारी प्रेमींसाठी पर्वणी डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी रेस्टॉरंटचे उद्घाटन करून आदर्श समूहाला शुभेच्छा दिल्या. हरिष गुलबानी यांनी आपल्या व्यवसायांमधून अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. दर्जेदार खाद्यपदार्थ हॉटेल आदर्शमध्ये यापूर्वी मिळतच होते. परंतु, आता शुद्ध शाकाहारी पदार्थही मिळणारा स्वतंत्र विभाग सुरू केल्याने शाकाहारी प्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. ‘आंगन’ रेस्टॉरंटमध्ये दाक्षिणात्या पदार्थांसोबतच चटपटीत पदार्थ, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, डेझर्ट, शाकाहारी थाळी, नुडल्स, चायनीज असे ग्राहकांना परवडतील, अशा दरामध्ये पदार्थ मिळतील. कार्यक्रमाला आदर्श परिवारातील सरिता गुलबानी, विष्णू गुलबानी, नंदकुमार गुलबानी, आकाश गुलबानी, आर्किटेक्ट दिनेश सुतार, अॅड. शांतीनाथ मिरजीसह हितचिंतक उपस्थित होते.









