बेळगाव/प्रतिनिधी:येथील चोखंदळ खवय्यांसाठी दर्जेदार खाद्यपदार्थांची श्रेणी उपलब्ध करून देणाऱ्या आदर्शा समूहाचे आंगन प्युअर व्हेज रेस्टॉरंट आता सुरू झाले आहे. कॉलेज रोडवरील हॉटेल आदर्श पॅलेस येथे आंगन प्युअर व्हेज हे नवीन रेस्टॉरंट सुरू झाले आहे यामधून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल अशी ग्वाही यावेळी संयोजकांनी दिली. याचे उद्घाटन बेळगावच्या डीसीपी पी .व्ही. स्नेहा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आदर्श समूहातर्फे हरीश गुलाबानी आणि पूनम गुलाबानी यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या वेळी मान्यवर निमंत्रित उपस्थित होते. त्यांनी आंगन प्युअर व्हेज रेस्टॉरंटला शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संयोजन आदर्श गुलाबानी आणि अश्विनी गुलाबानी यांनी केले होते. यावेळी सौ सरिता रमेश गुलाबानी, विष्णू गुलाबानी, नंदकुमार गुलाबानी, आकाश गुलाबानी, आर्किटेक्ट दिनेश सुतार , ॲड. शांतिनाथ मिरजी आणि मान्यवर निमंत्रित उपस्थित होते. या ठिकाणी ग्राहक वर्गासाठी त्यांच्या मागणीनुसार साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज ,कॉन्टिनेन्टल आणि इतर चवदार खाद्यपदार्थांची श्रेणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ग्राहक वर्गाच्या मागणीनुसार चाटचे विविध प्रकार आणि नवनवे खाद्यपदार्थ देखील उपलब्ध होणार आहेत. उत्कृष्ट आसन व्यवस्था ,,प्रसन्न वातावरण आणि तत्पर सेवा यांचा सुरेख संगम साधला आहे. . त्यामुळे बेळगावच्या हॉटेल व्यवसायात नवा पैलू उलगडणारे आंगन प्युअर व्हेज रेस्टॉरंट आता ग्राहकांसाठी उत्कृष्ट सेवा देण्याकरिता सज्ज आहे.









