आचरा प्रतिनिधी
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे आयोजित राम उत्सव आणि हनुमान जयंती निमित्त शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी राम गीतावर आधारित भव्य खुली एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये ७०००/- व चषक, द्वितीय पारितोषिक रुपये ५०००/- व चषकतृतीय पारितोषिक रुपये ३०००/- व चषक उत्तेजनार्थ क्र १ साठी रोख रुपये २०००/- व चषक, उत्तेजनार्थ क्र २ साठी रोख रुपये १०००/- व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेकांनी बाबू कदम ९४२१५७४७०० यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन समितीने केले आहे.
Previous Articleप्राथमिक आरोग्य केंद्रात बायोमेट्रीक हजेरी
Next Article नोकरानेच मारला 10 लाखांवर डल्ला









