सिकंदर शेख-सत्येंद्र मुखरीया यांच्यात प्रमुख कुस्ती
बेळगाव : अंकली येथे डॉ. प्रभाकर कोरे उत्सव समिती आयोजित माननीय डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात प्रमुख कुस्ती रूस्तुम-ए-हिंद महान भारत केसरी सिकंदर शेख व हिंद केसरी, भारत केसरी सत्येंद्र मुखरीया यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ तर भारत केसरी उमेश मथुरा यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती जाँटी बाटी भारत केसरी व महाराष्ट्र केसरी दादा शेळके, चौथ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर-कोल्हापूर व हरियाणा केसरी रजत रुहल, पाचव्या क्रमांकाची कुस्ती शुभम सिद्दनाळे वि. विपीन हरियाणा, सहाव्या क्रमांकाची कुस्ती शिवाप्पा पुजारी कर्नाटक व पवनकुमार हरियाणा यांच्यात, सातव्या क्रमांकाची कुस्ती नागराज बस्सीडोणी व सुमीत गुलिया,
आठव्या क्रमांकाची कुस्ती संगमेश बिराजदार व शिवानंद दड्डी निर्वाणहट्टी यांच्यात होणार आहे. तर महिला कुस्तीला प्राधान्य देण्यासाठी महिलांच्या कुस्तींचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख कुस्ती राष्ट्रीय पदक विजेती प्रियांका चहल व पुण्याची सोनाली मंडलिक यांच्यात, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती चंचल इलाल हरियाणा वि. ऋतिका जमदाडे, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती हलगा बस्तवाड लक्ष्मी पाटील वि. स्वाती पाटील बेळगाव यांच्यात होणार आहेत. याशिवाय लहान मोठ्या 80 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्तीचे खास आकर्षण म्हणजे कुस्तीचा जादुगार देवा थापा व रवीकुमार हिमाचलप्रदेश यांच्यात खास मनोरंजन कुस्ती होणार आहे. तर सर्व कुस्ती शौकीकांना खिळवून ठेवण्यासाठी आपल्या हलगीच्या तालावर कुरुंदवाडचे माजी नगरसेवक राजू आवळे व त्यांचे सहकारी उपस्थित राहणार आहेत.









