अभिनेत्री श्रीनिधी शेट्टींची उपस्थिती : सोन्या-चांदीच्या प्रत्येक खरेदीवर ऑफर
प्रतिनिधी/ बेळगाव
कॉलेज रोड येथील मलाबार शोरूमच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचा शुभारंभ शनिवारी थाटात पार पडला. मलाबार गोल्ड आणि डायमंड्सच्या भव्य शोरूमचे उद्घाटन लोकप्रिय कन्नड अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी व मान्यवरांच्या हस्ते फित सोडून करण्यात आले.
यावेळी अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी यांनी बोलताना मलाबार डायमंड्च्या प्रगतीबाबत गौरवोद्गार काढले, नूतनीकरण केलेल्या या शोरूममध्ये सर्वोत्तम दागिने पहावयास मिळणार आहेत. असेही त्या म्हणाल्या,
उद्घाटनानिमित्त ग्राहकांना सोन्या-चांदीच्या प्रत्येक खरेदीवर मोफत चांदीची नाणी देण्याची ऑफर ठेवण्यात आली आहे. 2 ते 10 मार्चपर्यंत ही संधी उपलब्ध होणार आहे. मलाबारमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे असंख्य नमुने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पारंपरिक दागिने आणि आधुनिक दागिने यांचा समावेश राहणार आहे.
मलाबारमध्ये ग्राहकांना सोने, हिरे, रत्न, चांदी, प्लॅटिनम आदी व्हरायटी पहायला मिळणार आहेत. मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, ग्राहकांना विविध ब्रँडचे दागिने उपलब्ध आहेत. मलबार गोल्ड आणि डायमंड्स किंमत, ग्राहकांचे हित, जुन्या सोन्याचे योग्य मूल्य, आदी गोष्टीत प्रामाणिकपणा जपला आहे.
मलाबार गोल्ड आणि डायमंड्स ही 1993 मध्ये स्थापन झालेली असून विविध देशामध्ये शोरूम उपलब्ध आहेत. या व्यवसायात पारदर्शकता ठेवून ज्वेलरी विक्रेत्यांमध्ये नाव कमविले आहे. यावेळी आदर्श हॉटलेचे हरिश गुलबानी, पिन्स बाबू, तौफीक, मन्सूर, लिजेश, जावेद, निजाम, सुरज, बेझल यांच्यासह व्यवस्थापक, सदस्य, कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.









