रत्नागिरी प्रतिनिधी
क्रेडाई, रत्नागिरी यांच्या माध्यमातून कोकणातील सहावे ‘वास्तूरंग’ प्रॉपर्टी एक्स्पो 2023 चे शुक्रवारी थाटात उद्घाटन करण्यात आल़े यावेळी जिल्हाधिकारी एम़ देवेंद्रसिंह, उद्योजक किरण सामंत, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, कोस्टगार्डचे कमांडींग ऑफिसर विकास त्रिपाठी, क्रेडाईचे पदाधिकारी आदी मान्यवराया उपस्थित होते.
शहरातील शासकीय जलतरण तलाव, साळवी स्टॉप येथे 22 ते 25 डिसेंबर 2023 दरम्यान या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहर व लगतच्या परिसरात उभारण्यात येणाऱया सदनिका, बंगलो, कमर्शियल स्पेस, एनए प्लॉटस, फार्म प्लॉटस यासारखे गुंतवणुकीचे असंख्य पर्याय उपलब्ध राहणार आहेत. या एक्स्पोमध्ये विविध बांधकाम व्यावसायिक यांचे स्टॉल आहेत़ त्याचप्रमाणे तातडीने बुकींग करावयाचे असल्याने बँकांचे स्टॉलही ठेवण्यात आले आहेत़ सर्व नागरिकांनी या एक्स्पोचा मोठय़ा संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन क्रेडाई, रत्नागिरीचे अध्यक्ष नित्यानंद भुते यांनी केले आहे. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष