Grand Inauguration of Dasavatar Theater Festival at Kalambaist
कलंबिस्त गावात सातत्याने गेली अकरा वर्ष दशावतार नाट्य महोत्सव घेऊन हनुमान दशावतार नाट्यमंडाने दशावतार लोककला जिवंत ठेवण्याचे काम केलं आहे . या मंडळाच्या माध्यमातून अनेक कलाकार निर्माण झाले आहेत हे कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात सातत्याने एखादा महोत्सव भरविणे आणि तो यशस्वी करणे ही खरी समाजसेवा आहे . असे मत सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांनी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून बोलताना स्पष्ट केले. कलंबिस्त हनुमान दशावतार नाट्य मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने 16 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्रोत्सवानिमित्त कलंबिस्त श्री लिंगेश्वर मंदिरात दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . या महोत्सवाचे उद्घाटन सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सैनिक ,चंद्रकांत शिरसाठ ,सुभाष सावंत बाळकृष्ण देसाई, माजी सरपंच शरद नाईक, गावकर अनिल सावंत ,देवकर विष्णू सावंत ,भाई देसाई ,रमेश सावंत ,बाबू बिडये ,धोंडी सावंत ,विश्वजीत सावंत सखाराम सावंत, आनंत सावंत अंतोन रोड्रिक्स राजेश पास्ते ,कृष्णा सावंत,अजित कदम,चंदू राजगे ,भाई सावंत ,सुनील सावं⁹त व सूत्रसंचालन प्रल्हाद तावडे आभार नरेंद्र बीडये मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी