“स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत शिबीर
वेंगुर्ले (वार्ताहर)-
स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे दि. 1 आँक्टोंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.या अभियानादरम्यान असंसर्ग जन्य रोग तपासणी शिबिरे( मधुमेह, रक्तदाब, कर्करोग), नेत्र तपासणी, दंत तपासणी, माता व बाल आरोग्य तपासणी( प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण), महिला व बालकांसाठी पोषण सत्रे, आयुष आणि योग शिबिर, क्षयरोग तपासणी व जागरूकता, रक्तदान शिबिर, अवयवदान प्रतिज्ञा शिबिर, व्यसनमुक्ती जागरूकता सत्रे, किशोरवयीन आरोग्य सत्रे, शालेय आरोग्य तपासणी शिबिर, आयुष्यमान, वय वंदना कार्ड, आभा कार्ड शिबिर घेण्यात येत आहेत.उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे दि. 1 ऑक्टोबर रोजी भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. तरी याचा वेंगुर्ला तालुक्यातील महिला व बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी केले आहे.









