‘सिल्क इंडिया 2025’
बेळगाव : वरमहालक्ष्मी आणि आषाढ मासाच्या पार्श्वभूमीवर, ‘अभिवृद्धी‘ संस्थेतर्फे ‘सिल्क इंडिया 2025‘ या भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन म. गांधी भवन, कॉलेज रोड, बेळगाव येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 13 ते 22 जून 2025 दरम्यान सकाळी 10.30 ते रात्री 8.30 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या विशेष प्रदर्शनात कर्नाटकच्या क्रेप व जॉर्जेट साड्या, तमिळनाडूच्या पारंपरिक कांजीवरम् साड्या, महाराष्ट्राच्या खास पैठणी साड्या, उत्तर प्रदेशातील लखनोवी चिकन शिफॉन सिल्क साड्या, तसेच पश्चिम बंगालमधील बालुचरी, आसाममधील मुगा व एरि सिल्क, ओडिशाच्या संभलपुरी व बोमकाई सिल्क, व छत्तीसगडच्या कोसा सिल्क, जम्मू आणि काश्मीरचे पश्मिना शॉल्स यासह विविध राज्यांमधील दर्जेदार व नयनरम्य सिल्क उत्पादने एकाच छताखाली पाहायला आणि खरेदी करता येणार आहेत.
लाभ घेण्याचे बेळगाववासियांना आवाहन
खवखवीत रंगसंगती, अत्याधुनिक डिझाइन्स आणि पारंपरिकतेची झलक असलेल्या या साड्या सणासुदीच्या आणि खास समारंभाच्या खरेदीसाठी योग्य ठरणार आहेत. विवाह समारंभ, साखरपुडा, उत्सव किंवा गिफ्टिंगसाठी दर्जेदार साड्यांची उत्तम संधी या प्रदर्शनात उपलब्ध आहे. या प्रदर्शनाचा लाभ बेळगाववासियांनी घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.









