व्हिडिओ गेम लव्हर्ससाठी मोठी पर्वणी
भारतात दर आठवड्याला एक नवा हॉलिवूडपट प्रदर्शित होत आहे. यातील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. आता सोनीने स्वत:च्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सोनी पिक्चर्सचा स्पोर्ट्स अॅडव्हेंचर चित्रपट ग्रां ट्यूरिस्मो भारतात 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्माते नील ब्लोमकँप यांच्यानुसार हा चित्रपट प्लेस्टेशन व्हिडिओ गेमवर आधारित अॅक्शनपट आहे. डेव्हिड हार्बर, ऑरलँडो ब्लूम, आर्ची मेडेकवे, डॅरेन बार्नेट, गेरी हॉलीवेल हॉर्नर आणि जिमोन हॉन्सो यात मुख्य भूमिका साकारत आहेत.
ग्रां ट्यूरिस्मो रोमांच अन् अॅक्शनने भरपूर कहाणी दर्शविणारा चित्रपट आहे. ग्रां ट्यूरिस्मो कार रेसिंग टीमच्या संघर्षाच्या अविश्वसनीय आणि सत्यकथेवर आधारित चित्रपट आहे. 2011 जीटी अकॅडमीच्या सर्वात कमी वयाचा विजेता जॅन मार्डेनबरोच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. 2011 मध्ये मार्डेनबरो हा जीटी अकॅडमी स्पर्धेत विजेता ठरला होता. या विजयामुळे त्याला निसान रेसिंग टीममध्ये स्थान मिळाले. चित्रपटाचे दिग्दर्शन नील ब्लोमकँप यांनी केले असून त्यांना डिस्ट्रिक्ट 9 आणि चॅपी यासारख्या सायन्स फिक्शन चित्रपटांसाठी ओळखले जाते.