शाहूवाडी प्रतिनिधी,संतोष कुंभार
Gram Panchayat Election 2022 : शाहुवाडी चनवाड ग्रामपंचायतच्या ठिकाणी नगरपंचायत व्हावी या मागणीसाठी शाहूवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकल्याने. मतदानाच्या दिवशी तालुक्यातील एकमेव शाहूवाडी चनवाड गावात निरव शांतता पसरली होती. तर अन्य ठिकाणी चुरशीने मतासाठी कार्यकर्त्यांच्या सह मतदारांची लगबग दिसत होती.
शाहूवाडीत वाढती लोकसंख्या,विकास कामासाठी अपुरा निधी यामुळे या ठिकाणी नगरपंचायत हवी अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे. नगरपंचायत करण्यासाठी शासन स्तरावर निर्णय झाला होता. मात्र त्यावर पुढे कोणतीच कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्वच ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याने तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक लागलेल्या गावात मतदानासाठी चांगलीच चुरस दिसत होती. तर शाहूवाडी चनवाड या ठिकाणी निरव शांतता पसरली होती.
शाहुवाडी चनवाड ग्रामस्थांच्या एकीचा यलगार कायमच
यावर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची शाहुवाडी चनवाड ग्रामस्थांनी घेतलेली भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरली आहे. सर्वपक्षीय कृती समितीसह युवक त्याचबरोबर वृद्ध नागरिकांनी नगरपंचायत व्हावी या मागणीसाठी केलेला एकीचा एल्गार चांगलाच चर्चेत आल्याने आता नगरपंचायत झाल्याशिवाय थांबायचं नाही.असाच पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याच ही दिसत आहे .
युवा मतदार,अमित सातपुते
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








