Grampanchayat Election 2022 : जिह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी (दि. 18) मतदान होत आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान करण्यास सुरवात होणार असून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 1827 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रशासनाकडूनही मतदान प्रक्रीयेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 3740 ‘ईव्हीएम’ (मतदान यंत्रे) सज्ज ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर 9135 अधिकारी व कर्मचारी असणार आहेत. थेट सरपंचपद आणि सदस्यपदासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
जिह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 430 थेट सरपंचपदासाठी 1193 इतके व 4402 सदस्यपदासाठी 8995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज मतदान होणार असून प्रत्येक मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष 1, निवडणूक अधिकारी 3, शिपाई 1 असे 5 कर्मचारी असणार आहेत. शनिवारी तालुकास्तरावर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. यानंतर निवडणूक साहित्य वाटप होऊन अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. गेला आठवडाभर उमेदवार व समर्थकांकडून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी थांबली. यानंतर नव्याने पुन्हा छुप्या प्रचाराला सुरुवात होवून मतदान फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे.
मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतरावर बुथ
मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ उभारता येणार नाही. तसेच मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेटसह शस्त्र बाळगण्यास बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
आठवडी बाजार रद्द
ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार रविवार 18 रोजी होणारे मतदान व मंगळवार 20 रोजी होणाऱया मतमोजणी दिवशी भरवता येणार नाहीत. या दोन दिवशी आठवडी बाजार रद्द करण्यात आले असून अन्य दिवशी बाजार भविण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
एकूण मतदार संख्या : 10 लाख 23 हजार 490
स्त्री मतदार : 4 लाख 95 हजार 047
पुरूष मतदार : 5 लाख 28 हजार 414
इतर मतदार : 29
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









