Gram panchayat Election 2022 : जिह्यात 4 हजार पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी तालुक्याच्या ठिकाणाहून हा बंदोबस्त मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आला आहे. 137 संवेदनशील गावांवर पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.
तालुक्याच्या ठिकाणी पोलीस उपअधिक्षकांनी सुचना देवून बंदोबस्त रवाना केला आहे. बंदोबस्त 18 डिसेंबर सायंकाळी मतदान पुर्ण होईपर्यंत राहणार आहे. त्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. बाहेरील जिह्यातील बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. 10 अधिकारी, 100 कर्मचारी मदतीला घेण्यात आले आहेत. मतदानानंतर ईव्हीएम मशिन तालुक्याच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. यासाठी स्वतंत्र बंदोबस्त रविवारी रात्री तैनात करण्यात येणार आहे. 22 डिसेंबर पर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे. तडीपार असणाऱ्या 5 जणांना पकडून कारवाई केली असून 750 जणांना वॉरंट बजावली आहेत. केंद्राबाहेर 100 मीटरपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केवळ मतदारालाच ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जाणार आहे.
हेही वाचा- Grampanchayat Election 2022 : जिह्यातील 429 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात
असा असेल पोलीस बंदोबस्त
पोलीस अधिक्षक 1
अपर अधिक्षक 2
उपअधिक्षक 7
निरीक्षक, 120
कर्मचारी 2500
होमगार्ड 1400
राज्य राखीव दलाच्या तुकड्या 1
अधिकारी (परजिल्ह्यातून) 10
कर्मचारी (परजिल्ह्यातून) 100
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









