प्रतिनिधी,कोल्हापूर
Grampanchayat Election 2022 : जिह्यातील 474 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान व 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.यासाठी सोमवार (दि. 28) पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे.पहिल्या दिवशी जिह्यात लोकनियुक्त सरपंच पदासाठी 119 व सदस्यपदासाठी 138 अर्ज दाखल झाले. सर्वाधिक करवीर तालुक्यातील अर्ज आहेत.गगनबावडा तालुक्यात एकही अर्ज दाखल झाला नाही.सर्व तालुक्याच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर उमेदवार व समर्थकांची गर्दी झाली होती.
उमेदवारी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरुन त्याची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱयाकडे सादर केली जात होती.सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हे अर्ज स्विकारण्यात आले.2 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु राहणार आहे.अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच उमेदवारांसह समर्थकांची गर्दी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाबाहेर झाली होती.करवीर तालुक्यात सरपंचपदासाठी 20 व सदस्य पदासाठी 27 अर्ज दाखल झाले.दोन्ही पदाचे अर्ज एकाचवेळी स्विकारण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा- राज्यात 1628 शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान कधी?
दाखल झालेले उमेदवारी अर्ज
तालुका ग्रामपंचायत सरपंच अर्ज सदस्य अर्ज
शाहुवाडी 49 14 05
पन्हाळा 50 08 29
हातकणंगले 39 12 17
शिरोळ 17 06 04
करवीर 53 20 27
गगनबावडा 21 – – – –
राधानगरी 66 18 18
कागल 26 07 04
भुदरगड 43 14 10
आजरा 36 09 15
गडहिंग्लज 34 10 07
चंदगड 40 01 02
एकूण 474 119 138
Previous Articleआम्ही उदयनराजेंच्या पाठीशी, त्यांना हतबल होऊ देणार नाही
Next Article रामेश्वर मच्छीमार संस्था अध्यक्षपदी जगदीश खराडे









