satara : ग्रामसेवकाला चक्क धक्काबुक्की करत गावाबाहेर काढल्याचा संतापजनक प्रकार साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये असलेल्या रासाटी गावात घडला आहे.रासाटी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दास्तान गावातील प्रवीण पाटील असं धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रवीण पाटील याला सरपंचाच्या सहीचा वारस नोंदीचा दाखला दिलेला असताना देखील हा दाखला सरपंचाच्या सहीचा नको तर ग्रामसेवक सहीचा पाहिजे अशी त्याची मागणी केली होती. मात्र वारस नोंदीचा दाखला ग्रामसेवकाच्या सहीचा देऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर प्रवीणने ग्रामसेवक भरत कोकणी यांना ग्रामपंचायत मध्येच धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्यांनतर ग्रामसेवक भरत कोकणी यांना धक्का देत गावाबाहेर काढलं.हा संपूर्ण प्रकार एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून याप्रकरणी कोयनानगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









