न्हावेली / वार्ताहर
ग्रामपंचायत मळेवाड -कोंडुरेकडून पंचायतराज अभियान अंतर्गत स्वच्छता मशाल फेरी काढून जनजागृती करण्यात आली.सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सर्व गावागावातून राबवले जात आहे . सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये हे अभियान मोठ्या जोमाने आणि उत्साहाने राबवले जात आहे. यालाच अनुसरून मळेवाड – कोंडुरे गावातील ग्रामस्थ,महिला बचत गट ,त्याचप्रमाणे गावातील विद्यार्थी,शिक्षक,लोकप्रतिनिधी यांना सहभागी करून ग्रामपंचायत कडून स्वच्छता मशाल फेरी काढण्यात आली. यावेळी स्वच्छ गाव सुंदर गाव, घरापासून सुरुवात करा , स्वच्छ भारत घडवा अशा घोषणा देऊन मळेवाड शाळा नंबर १ ते मळेवाड जकात नगर चौक अशी फेरी काढून स्वच्छते संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य स्नेहल मुळीक,मुख्याध्यापक वेंगुर्लेकर, शिक्षक बांबुळकर आदी उपस्थित होते.









