Hatkanangale Gram Panchayat Employees Strike : हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. कुंभोज ग्रामपंचायतील कर्मचारी 10 ते 13 एप्रिलपर्यंत संपावर आहेत. याबाबतचे निवेदन हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मोकानी याना संघटने आज दिले. यावेळी हातकणंगले तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीच्या दारात त्यांनी ठिय्या आंदोलन केले . संंपाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी 10 ते 13 एप्रिलला संपावर जाण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आज संपाला सुरुवात केली. ग्रामपंचायत कर्मचारी पुणे विभागीय सचिव शांतिनाथ धरणगुत्ते यांनी संपाबाबत माहिती दिली.
कर्मचाऱ्यांना सरकार अनेक ठिकाणी राबवून घेते परंतु, गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या मागण्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अनेक प्रकारच्या नोकरीच्या संदर्भात जीआर झाले. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यास सरकार तयार नाही. ग्रामपंचायत कर्मचारी असतानाही व निवृत्ती नंतरही सरकार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विचार करत नाही. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी 10 ते 13 एप्रिल रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपापल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देऊन संपावर जात असल्याच्या पूर्व सूचना दिल्या आहेत. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी राहुल कांबळे, अमर पवार, राजू कुंडले, अजय शिंदे, महिला राज्य कर्मचारी उपाध्यक्ष हसीना मुल्ला (हिंगणगाव) पोपट खोत, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









