Grampanchayat Election 2022 : जिह्यातील 222 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज रविवार 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. 67 सरपंच व 1100 सदस्य बिनविरोध झाल्याने आता 155 सरपंच आणि 666 सदस्यांच्या जागांसाठी लढत होणार आहे. सरपंचपदासाठी 406 व सदस्यांसाठी 1206 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात 508 केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी शनिवारी यंत्रांसह कर्मचारी केंद्रांवर रवाना होऊन या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीत सरपंचांसह 1766 सदस्यपदासाठी निवडणूक घोषित झाली होती. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले होते. जिह्यात काही ग्रामपंचायतींत ग्रामस्थांनी एकत्र येत राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे काही ग्रामपंचायतींमध्ये एक-एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
हेही वाचा- Grampanchayat Election 2022 : जिह्यातील 429 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात
काही ठिकाणी एकाहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. परंतु गावात सामोपचाराने झालेल्या बैठकांमधून तोडगा निघाल्याने बिनविरोधच्या दिशेने अनेकांनी पाऊल टाकत ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात मोलाचा सहभाग दिला. त्यामुळे 67 सरपंच तर तब्बल 1100 सदस्य हे मतदानापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहेत. जिल्ह्यात मंडणगड 1, दापोली 9, खेड 2, चिपळूण 13, गुहागर 9, संगमेश्वर 16, रत्नागिरी 6, लांजा 2 व राजापूर 9 सरपंच बिनविरोध निवडले गेले आहेत. तर मंडणगड 33, दापोली 184, खेड 52, चिपळूण 181, गुहागर 115, संगमेश्वर 167, रत्नागिरी 134, लांजा 99 व राजापूर 135 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









