आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली प्रतिनिधी
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट संरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्यातील पोटनिवडणूका असलेल्या 19 ग्रामपंचायती मधील 23 रिक्त सदस्य व एका थेट सरपंच जागेकरीता निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. पोटनिवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारावर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.
ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट संरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक – 18 एप्रिल 2023 (मंगळवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – 25 एप्रिल 2023 (मंगळवार) ते 2 मे 2023 (मंगळवार) वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 (दि. 29 एप्रिल 2023 चा शनिवार, दि. 30 एप्रिल 2023 चा रविवार व दि. 1 मे 2023 ची सार्वजनिक सुट्टी वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ – 3 मे 2023 (बुधवार) वेळ सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ – 8 मे 2023 (सोमवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ – 8 मे 2023 (सोमवार) दुपारी 3 नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – 18 मे 2023 (गुरूवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) – 19 मे 2023 (शुक्रवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक – 24 मे 2023 (बुधवार) पर्यंत.
जिल्ह्यात अप्पर सांगली मधील मौजे डिग्रज या ग्रामपंचायतीतील रिक्त असलेल्या थेट संरपंचाच्या रिक्त जागेसाठी (अनु. जमाती) पोटनिवडणूक होत आहे. तर शिराळा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीमधील 6 रिक्त सदस्य पदांसाठी, जत तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीमधील 7 रिक्त सदस्य पदांसाठी, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी 4 ग्रामपंचायतीमधील 4 रिक्त सदस्य पदांसाठी, पलूस व कडेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीमधील एका रिक्त सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
सदस्य पदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती, त्यामधील रिक्त सदस्य पदे व जागेचा तपशिल (प्रवर्ग) पुढीलप्रमाणे. शिराळा तालुका – कदमवाडी -सर्वसाधारण स्त्री १ व सर्वसाधारण १, कणदूर – अनु. जाती स्त्री १ व सर्वसाधारण १, गिरजवडे – अनु. जाती स्त्री 1, मोहरे- अनु. जाती स्त्री 1. जत तालुका – अंकलगी – अनु. जमाती – 1, अंकले – अनु. जाती स्त्री -1 व सर्वसाधारण स्त्री – 1, उटगी – नामाप्र स्त्री – 1, नामाप्र – 1 व सर्वसाधारण – 1, गुगवाड – सर्वसाधारण – 1. तासगाव तालुका – निंबळक – अनु. जाती स्त्री – 1, पाडळी – सर्वसाधारण – 1, जुळेवाडी – नामाप्र स्त्री – 1, योगेवाडी – सर्वसाधारण स्त्री – 1. कवठेमहांकाळ तालुका – अलकूड एम – सर्वसाधारण – 1, केरेवाडी – नामाप्र स्त्री – 1, इरळी – सर्वसाधारण – 1, बनेवाडी – नामाप्र – 1. कडेगाव तालुका – येवलेवाडी – नामाप्र स्त्री – 1. पलूस तालुका – माळवाडी – सर्वसाधारण – 1.








