अग्निशामक दलाचे जवानांसह स्थानिकांनी आग आणली आटोक्मयात
प्रतिनिधी / डिचोली
विठ्ठलापूर जवळील झरीवाडा सांखळीत आगीने उडवली दाणादाण सांखळी जवळील झरीवाडा येथे काल गुरु दि. 9 रोजी सकाळी डोंगराळ भागात लागलेल्या आगीने सर्वांचीच दाणादाण उडवली. अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला खरा, पण आगीपर्यंत पोहोचू न शकल्याने अखेर स्थानिकांना हातात बादली, कळशी घेऊन आग आटोक्मयात आणावी लागली. त्यात अग्निशामक दलाच्या जवानांनीही योगदान दिले.
काल गुरुवारी सकाळी झरीवाडा येथील घरांच्या मागे असलेल्या डोंगराळ भागात आग लागली. सदर आगीने अचानकपणे उग्र रूप धारण केले. लागलीच स्थानिक पंचसदस्य लक्ष्मीकांत शिरोडकर यांनी डिचोली अग्निशामक दलाशी संपर्क साधला. दलाचा बंब घटनास्थळी दाखलही झाला. आणि त्यांनी पाण्याची फवारणीही सुरू केली. परंतु या भागात जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने दलाची गाडी पुढे जाऊ शकली नाही.
अग्निशामक दलाच्या जवानांनी शक्मय होईल तेवढ्या अंतरावर पाण्याची फवारणी करून शक्मयतेप्रमाणे आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग हळुहळू वस्तीच्या जवळ पोहोचू लागल्यामुळे स्थानिकांनी घरातील बादली, कळशी, अन्य भांडी भरून आणली आगीवर मारण्यास सुरुवात केली. यात अग्निशामक दलाच्या जवानांनी तसेच पंचसदस्य लक्ष्मीकांत शिरोडकर यांनीही त्यांना मदत केली. अखेर सदर आग नियंत्रण आणण्यात त्यांना यश आले. आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पण या आगीने या भागातील लोकांची मात्र दाणादाण उडवली.









