प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा मंडळ नाथाजीराव हलगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटरचा पदवीदान समारंभ नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आयसीएमआरचे संचालक डॉ. सुबर्णा रॉय उपस्थित होते. निमंत्रित म्हणून विधानपरिषद सदस्य नागराजू उपस्थित होते.
प्रारंभी प्रा. डॉ. रमाकांत नायक यांनी स्वागत केले. उपप्राचार्या डॉ. प्रिती कुसगल यांनी वार्षिक अहवाल सादर केला. डॉ. अभिजित पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. पुष्पा पुडलकट्टी व डॉ. विरेंद्र उप्पीन यांनी विद्यार्थ्यांना कर्तव्य दक्षतेची शपथ देवविली.
डॉ. सुबर्णा रॉय यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा आणि आव्हानांना सामोरे जावे, असे सांगितले. अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी विद्यार्थ्यांने सुजाण नागरिक होणे आणि पुढे त्यांनी आपल्या पालकांची काळजी घेणे अपेक्षित आहे, असे सांगितले. नागराजू यादव यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी असायलाच हवी, यावर भर दिला. यावेळी डॉ. ऋचा मुतालिक व डॉ. आत्मेश शेट्यो यांना उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल डॉ. ऋचा मुतालिक यांना पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. विप्लवी पाटील व डॉ. दिपाली गुरव यांनी केले. डॉ. सई चांदनी यांनी आभार मानले.









