पदवीदान समारंभप्रसंगी मान्यवर.
बेळगाव :
येथील शेख बी. एड. महाविद्यालयात पदवीदान व दीपदान समारंभ नुकताच झाला. अध्यक्षस्थानी शेख ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या चेअरमन डॉ. सबीना व प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. एम. बी. जिरली उपस्थित होते. प्रार्थनागीताने कार्यक्रमाची सुऊवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्राचार्या डॉ. इंदिरा सुतार यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी अॅड. जिरली म्हणाले की, समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका मोठी आहे. शिक्षकांनी वेळेचे व्यवस्थापन करून जबाबदारीचे पालन व्यवस्थित केले पाहिजे. अध्यक्षीय भाषणात डॉ. सबीना म्हणाल्या, शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून अध्यापन व अध्ययन सुलभ केले पाहिजे. प्रा. उषा यांनी विद्यार्थ्यांना शपथ देवविली. प्रा. कोमल सांबरेकर यांनी आभार मानले.









