आईनस्टाइनपेक्षा आयक्यू पातळी अधिक
मेक्सिको सिटीत राहणारी अधारा पेरेझ सांचेझ ही 11 वर्षीय मुलगी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अल्बर्ट आइनस्टाइनपेक्षा अधिक आयक्यू असलेल्या अधाराने इंजिनियरिंगमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. सांचेझने सीएनसीआय विद्यापीठातून सिस्टीम इंजिनियरिंगमध्ये पदवी मिळविली अणि टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोमधून इंडस्ट्रियल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली आहे. अधाराचा आयक्यू स्कोर 162 इतका असल्याचे सांगण्यात आले. हा आकडा आइनस्टाइनपेक्षा अधिक आहे. 11 वर्षीय अधारा अंतराळवीर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे.

सांचेझने वयाच्या 5 व्या वर्षी स्वत:चे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि एक वर्षानंतरच माध्यमिक शिक्षण अन् पदवी प्राप्त केली. नासामध्ये सथान मिळविण्याच्या स्वप्नासह सांचेझ आता मेक्सिकन अंतराळ संस्थेसोबत काम करत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षीच सांचेझच्या उच्च आयक्यूबद्दल कळले होते. सांचेझ अत्यंत हुशार असल्याने तिचे मित्र तिला खूप चिडवायचे, शिक्षक देखील तिच्यावर लक्ष देत नव्हते असे तिच्या आईने एका मुलाखतीत म्हटले आहे.

शिक्षक सहानुभूतीपूर्ण नव्हते. शिक्षक तिच्याबद्दल वारंवार तक्रारी करायचे. अशा स्थितीत सांचेझ त्यांच्यापासून दूर होऊ लागली, ती स्वत:च्या मित्रांसोबत खेळू इच्छित नव्हती. यानंतर तिने शाळा सोडली, ती अत्यंत उदास असायची, तिची चेष्टा केली जायची असे तिची आई नायली यांनी म्हटले आहे. नायली यांनी तिची बुद्धिमत्ता ओळखली. सांचेझ मॅथ टेबल अत्यंत वेगाने तोंडपाठ करायची. प्रतिभावंत मुलांसाठीची शाळा सेंटर फॉर अटेंशन टू टॅलेंटमध्ये अधाराला प्रवेश मिळवून देण्यात आला.
सांचेझचा आयक्यू आईनस्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षा अधिक असल्याची पुष्टी या शाळेकडून करण्यात आली. मी अंतराळात जाऊ इच्छिते आाि मंगळ ग्रहावर वास्तव्य करू इच्छिते. नासामध्ये दाखल होण्याचे माझे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतेय असे अधाराने म्हटले आहे.









