कुंडल प्रतिनिधी
सुदानमध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत यादवी युध्दामुळे अनेक भारतीय अडकून पडले असून भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात असून आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात यश आले आहे.मात्र भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून बाराशे किलोमीटरवर सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरिक अडकले आहेत.
सांगली जिल्ह्यातील १०० लोकांसह भारतातील ४५० हून अधिक नागरिक सुदान मधील केनाना शुगर कंपनी मध्ये कार्यरत असून त्यांची सुटका करण्यासाठी पदवीधर आमदार अरुण (अण्णा) लाड यांनीमाजी कृषीमंत्री खा. शरदचंद्रजी पवार व खा. सुप्रियाताई सुळे यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेऊन आपल्या लोकांना परत भारतामध्ये आणण्यासाठी आमदार अरुण (आण्णा) लाड यांचे प्रयत्न सुरु आहेत.
निश्चित केलेल्या ठीकाणी पोहचण्याच्या मार्गावरील साधारणतः साडेचारशे कि.मी. वर सशस्त्र चकमक सुरु असल्याने रस्ता मार्गाने निर्धारित ठिकाणी पोहचणे धोकादायक असल्याचे नागरीकांनी कळविले असुन त्यांना अन्यमार्गाने भारतात आणण्यासाठी प्रयत्न सरकारकडून केले जावेत यासाठी खा.शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन विनंती आ.अरुण लाड यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








