मुंबई
जीआर इन्फ्राप्रोजेक्ट यांचा समभाग बुधवारी शेअर बाजारात दौडताना दिसला. कंपनीला महामार्ग विकासाच्या कामाचे कंत्राट प्राप्त झाल्याने समभाग वधारताना दिसला. बीएसईवर समभाग 4 टक्के इतका शेअर बाजारात इंट्रा डे दरम्यान वाढत 1425 रुपयांवर व्यवहार करत होता. राष्ट्रीय महामार्ग विकासाचे 1457 कोटी रुपयांचे कंत्राट कंपनीने प्राप्त केले आहे. वर्षभरात समभाग 10 टक्के तर गेल्या 6 महिन्यात 25 टक्के वाढला आहे.









