खाणखात्याकडून कारवाई सुरू : पिसुर्ले येथील खाणमालकावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी /वाळपई
यापुढे सत्तरी तालुक्मयातील बेकायदा चिरेखाणीवर खाण खात्याचे विशेष लक्ष ठेवणार असून त्याबाबत आराखडा तयार करण्यात आलेला आहे. खाण खात्याच्या अधिकाऱयांनी नुकतीच पिसुर्ले येथील बेकायदा चिरेखाणीवर छापा मारला होता. मात्र त्या ठिकाणी उत्खनन बंद असल्यामुळे संबंधितांना कारवाईतून सुटका मिळाली. मात्र या ठिकाणी नव्याने चिऱयाखाणीचा व्यवसाय सुरू झाला असून या संदर्भाची रीतसर तक्रार वाळपई पोलीस स्थानकावर सादर करण्यात आली आहे. याशिवाय बेकायदा चिरेखाण व्यवसाय सुरू असणाऱया जमीन मालकांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस खाण खात्याच्या अधिकाऱयांनी केली आहे.
सत्तरी तालुक्मयात सुमारे 30 पेक्षा जास्त बेकायदा चिरेखाणीचा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. गेल्या दहा वर्षांपासून हा व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून या संदर्भात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र त्याकडे अद्याप विशेष लक्ष देण्यात आलेले नाही.
चिरेखाणींचा प्रश्न ऐरणीवर!
सध्या दक्षिण गोव्यात बेकादा चिरेखाणींचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठांमध्ये सदर प्रकरण न्यायप्रवि÷ असल्यामुळे याची विशेष दखल घेऊन खाण खात्याने सत्तरी तालुक्मयातील चिरेखाणींच्या व्यवसायावर विशेष नजर ठेवलेली आहे. सरकारने कारवाईच्या दृष्टीने पावले उचललेली आहे.
दोन दिवसांपूर्वी खाण खात्याच्या दोन अधिकाऱयांनी पिसुर्ले येथील खाणांवर छापा मारला. मात्र येथील व्यवसाय बंद असल्यामुळे कोणत्याही कारवाई करू शकले नाहीत. दरम्यान, सदर भागात बेकायदा चिरेखाण व्यवसाय नव्याने सुरू केलेला आहे. याप्रकरणी संबंधित चिरेखाण मालकावर वाळपई पोलिस स्थानकावर दाखल केली आहे. त्यानुसार चिरेखाण मालकावर भारतीय दंड संहिता 379 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून यासंदर्भात पुढील कारवाई सुरू आहे, असे अधिकाऱयांनी स्पष्ट केले. दरम्यान खाण खात्याच्या छाप्यानंतर इतर चिरेखाण मालकांचे धाबे दणाणले आहे. यामुळे काही खाणींवरील काम बंद केले आहे.
हनुमंत परब यांनी केली होती तक्रार!
दरम्यान दोन वर्षांपूर्वी पिसुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी यासंदर्भाच्या तक्रारी खाण खात्याकडे सादर केल्या होत्या. सदर भागांमध्ये सुरू असलेला खाणींचा व्यवसाय बेकायदेशीर आहे. यामुळे पर्यावरणाची मोठय़ा प्रमाणात हानी होत आहे .त्याचप्रमाणे सरकारच्या तिजोरीची मोठय़ा प्रमाणात लूट सुरू असताना सुद्धा सरकारची यंत्रणा गांभीर्याने दखल घेत नाही, असा आरोप त्यांनी अनेक वेळा पत्रकार परिषदेतून केला आहे.









